महामानवाला अभिवादन

 Santacruz
महामानवाला अभिवादन

कालिना - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यावेळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तुत्वाचा चढता आलेख मांडला. संशोधक विद्यार्थी संजय कांबळे यांनी विद्यार्थी दशेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थ्यांप्रती असणारा विचार काय होता ते भाषणातून सांगितले. त्यानंतर भंते राष्ट्रपाल अावटे यांनी बाबासाहेबांचे अभिवादन करणे म्हणजे बाबासाहेबांची पूजा करणे नव्हे तर त्यांच्या मानवतेच्या विचारांचे पालन करून आयुष्यभर स्मरण केले पाहिजे असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाला वसतिगृहातील विद्यार्थी यांच्यासह शिपाई देखील उपस्थित होते.

Loading Comments