Advertisement

सुधीर मुनगंटीवार सिद्धीविनायकाच्या चरणी


SHARES

प्रभादेवी - अर्थसंकल्प जाहीर करण्यापूर्वी वित्तमंत्री सुधीर मुंनगंटिवार यांनी प्रभादेवी येथे मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकचे दर्शन घेतले. या वेळी मुंनगंटिवार म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी मी सिद्धिविनायक चरणी प्रार्थना केली आहे. कर्जमुक्तीच्या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सर्व संकटांवर मात करण्यासाठी बळ दे हे सांगण्यासाठी सिद्धिविनायकच्या दर्शनाला आलो आहे, असे मुंनगंटिवार म्हणाले.

"मंत्रालयात खुर्चीवर बसून निर्णय घेणे सोपे आहे. पण सत्य परीस्थितीत शेतकरी करतात ते कष्ट अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे आहेत. जनतेने आम्हांला त्यांच्या समस्या सोडवण्सासाठीच निवडून दिले आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी मी पूर्ण प्रयत्न करत आहे," असे मुंगनटिवार यांनी स्पष्ट केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा