Advertisement

"उठ दुपारी अन् घे सुपारी" असा राज ठाकरेंचा कार्यक्रम, सुषमा अंधारेंची टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे.

"उठ दुपारी अन् घे सुपारी" असा राज ठाकरेंचा कार्यक्रम, सुषमा अंधारेंची टीका
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे.

"आमच्याकडे एक असा माणूस आहे पठ्ठ्या.. उठ दुपारी अन् घे सुपारी... असा त्यांचा कार्यक्रम असतोय.. याला थोडं बोलेन.. त्याला थोडं बोलेन.. काही वेळासाठी विचारवंत होईल.. मध्येच मिमिक्री कलाकार होईल... असा त्यांचा कार्यक्रम असतो..." असे बोचरे वार अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर केले.

मुंबईतील नेस्को मैदानात गटाध्यक्षांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर तसेच त्यांच्या अकार्यक्षमतेवर टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं.

"अचानक गुहेतून बाहेर येतात... अचानक सभा घेतात... पुन्हा पुढच्या निवडणुकीलाच येतात... मला सांगायचंय दोनच मुद्दे मांडा पण व्यवस्थित मांडा ना... मी यालाही थोडं बोलेन.. त्यालाही थोडं बोलेन... मी मध्येच विचारवंत होईल.. मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईन... मी मध्येच पेंटर होईन.. मग त्यावरून लोक समजतील मी कुणीतरी मोठा आहे.... भावाच्या आजारपणावर बोलणाऱ्या आणि आजारपणाची चेष्टा करणाऱ्या नेत्यावर मी काय बोलू.... मला काहीच बोलू वाटत नाही... असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची 'महाप्रबोधन यात्रे'ची सभा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या बालेकिल्ल्यात मुलुंड येथे पार पडली. या सभेत त्यांनी भाजप-शिंदे गटासह मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.हेही वाचा

BMC Elections : पालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर

राज्यपालांच्या विधानानंतर उद्धव ठाकरे आक्रमक, महाराष्ट्र बंदचा इशारा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा