Advertisement

दूधकोंडी आंदोलन मागे - राजू शेट्टींची घोषणा


दूधकोंडी आंदोलन मागे - राजू शेट्टींची घोषणा
SHARES

दूध दराबाबत सरकारने निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यात चार दिवसांपासून सुरू असलेलं दुधकोंडी आंदोलन गुरुवारी मागे घेण्यात आलं. दुधाला प्रतिलिटर किमान २५ रुपये भाव देण्याचा राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घेतलं. त्यामुळे मुंबई आणि अन्य शहरांतील दूध पुरवठा धोखा टळला आहे.


काय म्हणाले राजू शेट्टी

दुधाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतो. इतर राज्यातून येणाऱ्या दुधाला अनुदान मिळतं. त्याप्रमाणेच राज्य सरकारनेही निर्णय घेतल्याने सरकार अभिनंदनास पात्र आहे. त्यामुळे हे दूधकोंडी आंदोलन मागे घेत शुक्रवारपासून राज्यात दूध पुरवठा सुरळीत होईल, अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली. 

शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान द्यावं, अशी आमची मागणी होती. आता सरकारने जाहीर केलेलं अनुदान शेतकऱ्यांना मिळावं, अशी अपेक्षा करत असल्याचंही ते म्हणाले.


मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत...

यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी दूध संघाच्या संचालकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने दुधाचे दर पाच रुपये वाढवून दिले असून येत्या 29 जुलैला या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा