महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (maharashtra election 2024) साठी राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्ल्क राहिला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील निवडणुका (assembly election) महायुती आणि महाविकास आघाडी (maha vikas aghadi) यांच्यातील सलग दुसरी लढत असेल.
भाजप (bjp), एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस अशी सत्ताधारी महायुती आहे. तिन्ही पक्षांनी त्यांच्या उमेदवारांच्या सुरुवातीच्या याद्या जाहीर केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोपरीमधून तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नागपूर आणि बारामती या त्यांच्या होम ग्राउंडवरून लढणार आहेत.
अनेक पक्षांमध्ये लढत असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेल्या पक्षांची महाराष्ट्रातील पहिली विधानसभा निवडणूक आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोपरी-पाचपाखाडी (147) मधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे यांचे मूळ गाव आणि राजकीय बालेकिल्ला ठाणे (thane) शहरातील कोपरी मतदारसंघ आहे. शिंदे यांनी 2009 पासून कोपरीचे आमदार म्हणून काम पाहिले आहे. 2004 ते 2009 पर्यंत त्यांनी ठाणे मतदारसंघाचे आमदार म्हणून काम केले.
शिवसेनेतील गटबाजीने या निवडणुकीत हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. कोपरी-पाचपाखाडी हे ठाणे शहरात वसलेले आहे. ज्याला मोठ्या प्रमाणात मराठी लोकसंख्या असलेला शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.
लोकसभा 2024 च्या निवडणुकीत, एकनाथ शिंदे यांचे उजवे हात असलेले नरेश म्हस्के यांनी शिवसेनेचे (UBT) विद्यमान खासदार राजन विचारे यांचा पराभव करून ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार बनले.
शिवसेना (shiv sena) (उबाठा) आणि शिवसेना (शिंदे) हे दोन्ही गटांसाठी विधानसभा निवडणुकीसाठी कोपरी मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा मुद्दा ठरणार आहे. पक्षाने अद्याप आपले उमेदवार जाहीर केले नसले तरी ठाकरेंची सेना एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार उभा करू शकते.
एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे 2009 पासून विद्यमान खासदार आहेत. शिंदे यांनी 2019 मध्ये काँग्रेसचे उमेदवार पांडुरंग घाडीगावकर यांचा 89,300 मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये त्यांनी भाजपचे उमेदवार संदीप लेले यांचा 51,869 मतांनी पराभव केला होता.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी एक म्हणजे कोपरी-पाचपाखाडी, जेथे सेनेचे उबाठाचे राजन विचारे यांचा एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय नरेश म्हस्के यांच्याकडून पराभव झाला. ठाणे जिल्हा हा शिंदेंचा बालेकिल्ला असल्याने महायुतीचा विजय महत्त्वाचा होता.
ठाणे लोकसभा मतदार संघातून म्हस्के यांना 7,34231 मते मिळाली. तर विचारे यांना 5,17,220 मते मिळाली. कोपरी-पाचपाखाडी विधानसभेतून विचारे यांना 66,260, तर म्हस्के यांना 1,11,135 मते मिळाली.
महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षात सध्या 202 आमदार आहेत. राष्ट्रवादीकडे (अजित पवार) 40, शिवसेना (शिंदे) 38, भाजपकडे 102 आणि इतर पक्षांना 24 जागा आहेत.
महाविकास आघाडीकडे (MVA) 69 जागा आहेत. काँग्रेससाठी 37, शिवसेनेला (UBT) 16, राष्ट्रवादी (शरद पवार) 12 आणि इतर पक्षांना 6 जागा आहेत.
20 नोव्हेंबर ही महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांसाठी एकल टप्प्यातील निवडणुकीची तारीख आहे. 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
हेही वाचा