Advertisement

झीशान सिद्दीकी यांना धमकीचा फोन

दरम्यान, अभिनेता सलमान खानलाही नुकताच धमकीचा फोन आला होता.

झीशान सिद्दीकी यांना धमकीचा फोन
SHARES

राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी (baba siddique) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. मात्र त्यांचा मुलगा झीशान सिद्दिकींनाही (zeeshan siddique)वडिलांच्या हत्येच्या काही आठवड्यांनंतर धमकीचा फोन (threatening call) आला होता. शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आलेला हा कॉल झीशान सिद्दिकींच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात आला होता.

नोएडा (noida) येथून 20 वर्षीय युवकाला धमकीचा कॉल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दरम्यान, अभिनेता सलमान खानलाही नुकताच धमकीचा फोन आला होता.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, झीशान सिद्दीकी आणि सलमान खान या दोघांना एकाच व्यक्तीने कॉल केले होते. मुंबई (mumbai) पोलिसांनी त्वरीत या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि धमकीचा कॉल केल्याप्रकरणी 20 वर्षीय तरुणाला नोएडा येथून अटक केली.


बाबा सिद्दीकींच्या हत्येबद्दल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी हत्या (murder) करण्यात आली होती. मुंबईतील वांद्रे येथील त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकींच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. गोळ्या झाडण्यासाठी गोळीबार करणाऱ्यांनी जवळच असलेल्या दसऱ्याच्या निमित्ताने लावलेल्या फटाक्यांच्या आवाजाचा फायदा घेतला.

हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या बिश्नोई टोळीने सलमान खानशी असलेले जवळचे संबंध हे हत्यमागचे कारण असल्याचे सांगितले. 



हेही वाचा

मध्य रेल्वेच्या नव दुर्गा पथकाची 11,971 तिकीट विरहित प्रवाशांवर कारवाई

विधानसभा निवडणुकीसाठी आठ माजी नगरसेवक रिंगणात




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा