महाराष्ट्रात (maharashtra) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (election nomination) भरण्याची 29 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. मात्र, महाविकास आघाडी (maha vikas aghadi) आणि महायुतीकडून (mahayuti) अद्यापही अनेक जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. दोन्ही आघाड्यांमध्ये अनेक जागांवर बंडखोरी होत आहे.
उत्तर मुंबई (mumbai) लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र, भाजपचे विद्यमान आमदार सुनील राणे यांनीही या जागेवरून दावा मांडला होता. पक्ष हायकमांडने दोन्ही उमेदवारांना तिकीट न देता संजय उपाध्याय यांना तिकीट दिले आहे. त्यानंतर आता गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला असून ते निवडणूक लढवणार आहेत.
पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा गेल्या बारा तासांपासून उपलब्ध नाहीत. काल संध्याकाळी अचानक घरातून निघालेले वनगा अद्याप घरी परतले नाही. वनगा यांचे दोन्ही फोन बंद असल्याने कुटुंबीय अत्यंत चिंतेत असून, कुटुंबासह पोलीस प्रशासन वनगा यांचा शोध घेत आहे.
रामटेक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी अपयशी ठरली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळीक आज अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार आहेत.
हेही वाचा