SHARE

मुंबई - मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. परंतु हे उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना घरात शौचालय असल्याचे पुरावे जोडावे लागणार आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी मोजकेच काही अर्ज महापलिकेच्या विभाग कार्यालयात सादर करण्यात आले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या उमेदवाराच्या घरात शौचालय असणे बंधनकारक असून, जो उमेदवार घरातील शौचालयाचा वापर करतो त्यालाच निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार असेल, अशाप्रकारचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे आता महापलिकेच्या निवडणुकीत घरात शौचालय आहे, अशा प्रकारचे विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या स्वाक्षरीचे पत्र उमेदवाराला अर्जासोबत जोडावे लागणार आहे. सहाय्यक आयुक्त (निवडणूक) संजोग कबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शौचालयासंदर्भातील पत्र जोडणे बंधनकारक असल्याचे सांगितले. मात्र, घरात शौचालय असणे हे आवश्यक आहे, पण घरात नसेल तर सामुदायिक शौचालयाचा वापर तरी ते करत असावेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या