Advertisement

मोदींची मुंबईला ख्रिसमस गिफ्ट


SHARES

वांद्रे - शिवस्मारकाच्या जलपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये मेट्रो आणि इतर योजनेचं भूमिपूजन केलं. या वेळी त्यांनी मुंबईसाठी 1 लाख 6 हजार कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभ करत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच टायमिंग साधला. त्याचवेळी आपली बाजू लावून धरत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या विकासामध्ये सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवावं असं आवाहन केलं. नोटबंदीवर बोलताना नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्य माणसांचा 50 दिवसांनंतर त्रास कमी होणार आहे तर भ्रष्ट्राचार करून कमावलेल्या लोकांचा त्रास सुरू राहणार असल्याचं सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये मागील सरकारनं अर्धवट ठेवलेली कामं युती सरकार पूर्ण करेल असं सांगितलं. शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या विरोधात बोलणाऱ्या समाचार घेताना जे इतिहास विसरतात ते भविष्य घडवू शकत नाही, असा टोलाही लगावला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवस्मारकाच्या कामाचं यंदा कौतूक केलं. पण शिवाजी महाराज यांचे किल्ले आणि गड यांची जवाबदारी केंद्रानं न घेता राज्य सरकारला द्यावी अशी मागणी केली. तसंच मुंबईच्या पूर्व किनारपट्टीला मोकळ्या जागेमध्ये स्वांतत्र्यसैनिकांचे मोठे म्युझियम तसेच सर्वसामान्य मुंबईकर या भागामध्ये जाऊ शकेल असा विकास करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिवस्मारक आणि मेट्रो योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना, भाजपा पक्ष जरी व्यासपिठावर एकत्र आले असले, तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भाषणामध्ये महापालिका निवडणुकीच्या तयारीची छाप पहायला मिळाली.

संबंधित विषय
Advertisement