पारदर्शकतेमुळे गडकरी अडचणीत

  Mumbai
  पारदर्शकतेमुळे गडकरी अडचणीत
  मुंबई  -  

  मुंबई -  विरोधी पक्षात असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपाच्या पारदर्शकतेचा पर्दाफाश राष्ट्रवादीच्याच एका युवा कार्यकर्त्याने केलाय. नितीन देशमुख असं या कार्यकर्त्याचं नाव असून, त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एमईपी इंफ्रा डेव्हलेपमेंटचे एम.डी जयंत म्हैसकर यांच्यासोबत कारमध्ये बसलेला फोटो काढलाय आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

  एमईपी इंफ्रा डेव्हलेपमेंट कंपनी मुंबईसह राज्यातील मोठ्या टोलनाक्यांवर टोल वसुली करते. एका बाजूला भाजपा इतर पक्षांवर भ्रष्टाचाराचा आरोप करतंय तर दुसऱ्याबाजूला भाजपा नेत्यांच्या कारमध्ये टोल कंत्राटदार बसतात असा आरोप नितीन देशमुख यांनी केलाय.

  नितीन देशमुखने काढलेले फोटो सोमवारी सोशल मिडियामध्ये वायरल झाले. या फोटोमुळे शिवसेनेलाही भाजपाच्या तथाकथित पारदर्शकतेवर टीका करण्याची संंधी मिळाली. शिवसेना आमदार आणि विभागप्रमुख अनिल परब यांनी भाजपाने स्वत: पाहावे की किती पारदर्शकता आहे. आणि पंतप्रधानांनी याबाबत लक्ष घालावे अशी मागणी केली. दरम्यान याबाबत भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांना विचारले असता त्यांनी सावध प्रवित्रा घेत अद्याप फोटो पाहिले नसल्याने माहिती घेऊन बोलू अशी प्रतिक्रिया दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.