रामदास आठवलेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

 Mumbai

See all
Mumbai  -  

भोईवाडा - महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच इच्छुक उमेदवार आपल्या पक्षाचा झेंडा प्रभागात लागण्यासाठी छोटे-मोठे कार्यक्रम राबवत आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनंही प्रभागात विविध कार्यक्रमांचं आयोजन करून मतदारांना आकर्षित करण्यात येत आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त वॉर्ड क्रमांक 200चे अध्यक्ष ओम सावंत यांच्या वतीनं बालजल्लोष 2016 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी भोईवाडा अण्णाभाऊ साठेनगर येथील मनोरंजन मैदानात हा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम बच्चेकंपनीसाठी असल्याने धमाल आणि मस्ती करण्याची एक उत्तम संधी त्यांना मिळाली. कार्यक्रमात मनोरंजक खेळ आणि खाऊची मेजवानी असल्यामुळे बच्चेकंपनीनंही या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात हजेरी लावून मनमुराद आनंद लुटला.

Loading Comments