Advertisement

चांदीवलीमध्ये मनसेला खिंडार


चांदीवलीमध्ये मनसेला खिंडार
SHARES

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेकडून उमेदवारी दिलेल्या चांदीवलीतील दोन मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भाजपात प्रवेश केला. शुभ्रांशू दीक्षित आणि प्रदीप बंड अशी या दोन पदाधिकाऱ्यांची नावे असून, त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे मनसेला चांदिवलीमध्ये खिंडार पडले आहे. चांदिवली विभाग हा अजूनही मनसेचा गड मानला जात होता. परंतु मनसेतील सक्रिय असलेले हे दोन्ही पदाधिकारी भाजपामध्ये गेल्याने हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या दोघांनी माटुंगा येथील भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे संघटन मंत्री रवींद्र भुसारी, उपाध्यक्ष प्रसाद लाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा