जनसंपर्क अधिकाऱ्याच्याच 'पोस्ट'ला ठरवले अनधिकृत

 Dadar (w)
जनसंपर्क अधिकाऱ्याच्याच 'पोस्ट'ला ठरवले अनधिकृत
जनसंपर्क अधिकाऱ्याच्याच 'पोस्ट'ला ठरवले अनधिकृत
See all

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जनसंपर्क अधिकाऱ्याच्याच 'पोस्ट'ला अनधिकृत ठरवले. नुकतीच शिवसेनेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने जर मनसेने बिनशर्थ पाठिंबा दिला अन् मुंबई महापालिकेत एकही उमेदवार मनसे उतरवणार नाही, अशी जाहीर घोषणा केली तरच मनसेवर विश्वास ठेवता येईल. अन्यथा मनसेचा अजेंडा म्हणजे भाजपाची सुपारी आहे हे सिद्ध होईल अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी ती पक्षाच्या अधिकृत साईटवर टाकलेली पोस्ट नसल्याचे सांगितले. तसेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ज्या पोस्ट टाकल्या जातात त्याच शिवसेनेच्या अधिकृत पोस्ट असतात अशी माहितीही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिली.

Loading Comments