Advertisement

उद्धव ठाकरे यांनी घेतली शिवसंपर्क अभियानाची आढावा बैठक


उद्धव ठाकरे यांनी घेतली शिवसंपर्क अभियानाची आढावा बैठक
SHARES

दुष्काळग्रस्त भागातील जनतेसोबत संपर्क साधण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या शिवसंपर्क अभियानाची आढावा बैठक शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात घेतली. या बैठकीला शिवसेनेचे नेते, उपनेते, पदाधिकारी आणि संपर्क प्रमुख हजर होते. बैठकीत शिवसंपर्क अभियानाचा पुढील टप्पा, विषय, दिशा याबाबत उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या बैठकीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, दुष्काळग्रस्त भागातील शिवसंपर्क अभियानाची ही आढावा बैठक होती. संवाद आणि संपर्काचं म्हणाल तर शिवसेनाला राजकीय संवाद यात्रेची जरूर वाटत नाही. कारण आमचा संवाद महाराष्ट्राच्या जनतेशी 365 दिवस असतो. त्यामुळेच संपर्क प्रमुखांना बोलावून त्यांच्याकडून दुष्काळग्रस्त भागातील स्थितीची माहिती घेतली.

कालच्या सामनामध्ये भाजपचे मंत्री विनोद तावडे यांचे कौतुक करणारा अग्रलेख होता. तो जाळला म्हणताय? नक्की कोणाला जाळलं? सामनाची होळी केली, कारण सामना ज्वालाग्रहीच आहे. आम्ही धगधगते आहोत. ज्याला सामनाचे चटके बसतात त्यांनीच होळी केली. होळी करणाऱ्यांनी त्यांचे हात होरपळणार नाहीत याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा