अजून आठ दिवस वाट पाहिन मग बोलेन - उद्धव ठाकरे

 Pali
अजून आठ दिवस वाट पाहिन मग बोलेन - उद्धव ठाकरे

पाली- 1000-500 नोटा बंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांची ओढाताण होतेय. मात्र 50 दिवसांनी परिस्थिती सुधारेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्याला आता फक्त आठ ते दहा दिवस उरलेत, त्यानंतर नोटबंदीवर मी बोलेन असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय. तसेच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्यावर अन्याय होवू देणार नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. येत्या शनिवारी शहापूरजवळच्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे भेटणार आहेत. याची आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांना महामार्गाची कुणकुण लागल्यावर आसपासच्या जमिनी कवडीमोल भावात विकत घेतल्या आहेत. आता उरलेल्या जमिनीही सरकार प्रकल्पासाठी घेणार असेल, तर नागरिकांनी खायचं काय? असा सवाल शहापूर तालुक्यातले शेतकरी विचारत आहेत. आता याप्रश्नी उद्धव ठाकरेही शेतकऱ्यांच्या बाजूनं उभे राहिले आहेत.

Loading Comments