व्यंगचित्राबद्दल उद्धव ठाकरेंची माफी

 Dadar
व्यंगचित्राबद्दल उद्धव ठाकरेंची माफी

दादर - सामनातल्या वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागितली आहे. व्यंगचित्रामुळे भावना दुखावल्या असल्यास, शिवसेनेचा प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील माझ्या माता-भगिनींची माफी मागतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागितली आहे. पत्रकार परिषद घेऊन उद्धव यांनी जाहीर माफी मागितली.

गेल्या आठवड्यात व्यंगचित्रावरुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. व्यंगचित्राचा हेतू अपमान करण्याचा नव्हता. व्यंगचित्राचा अपप्रचार माझ्या जिव्हारी लागला आहे, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच व्यंगचित्राच्या वादावरून उगाच राजीनाम्याच्या अफवा पसरवल्या गेल्या असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Loading Comments