Advertisement

3 महिन्यांचं रेशन मोफत मिळणार, निर्मला सीतारामन यांची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत 1 लाख 70 हजार कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे.

3 महिन्यांचं रेशन मोफत मिळणार, निर्मला सीतारामन यांची घोषणा
SHARES

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी 1 लाख 70 हजार कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.

देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.  गरीबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ १ किलो डाळ मोफत मिळणार. पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना असणार आहे. . देशातील ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.   आशा वर्कर, नर्सेस आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचंही सीतारामन यांनी जाहीर केलं. देशभरातील २० लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

'हे' घेतले महत्वाचे निर्णय

  • ३ महिने तांदूळ, गव्हाचे तसेच डाळींंचे गरिबांसाठी मोफत वाटप
  • उज्ज्वला योजनेअंतर्गत ८ कोटी दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना तीन महिने मोफत गॅस मिळणार
  • गरीब वृद्ध, गरीब दिव्यांग आणि गरीब विधवांसाठी अतिरिक्त १ हजार रुपये मिळणार.
  • मनरेगा अंतर्गत ५ कोटी कुटुंबांना सरकार मदत करणार
  • मनरेगाअंतर्गत मजुरांना दररोज २०० रुपये देणार.
  • एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होणार
  • जनधनअंतर्गत महिलांच्या खात्यात ५०० रुपये टाकण्याचा निर्णय
  • देशातील ६३ लाख स्वयं सहायता समुहांना प्रत्येकी २० लाख रुपये मिळणार
  •  ज्यांना १५ हजारांपेक्षा कमी वेतन मिळते अशा कर्मचाऱ्यांच्या पीएफमधील सर्व भाग सरकार भरणार
  • किसान सन्मान योजनेतील पहिला हफ्ता तत्काळ देणार.
  • वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना ५० लाख रुपयांचा विमा देणार-सीतारामन



हेही वाचा -

Coronavirus Updates: १४ एप्रिलपर्यंत लोकल बंद

Coronavirus Updates: प्रभादेवीत 'त्या' महिलेला करोनाची लागण


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा