Advertisement

उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी, निलेश राणेंची जीभ घसरली

राणे म्हणाले, ते चांगल्या भाषेत ऐकणार नाही. त्यांना फटके द्यायला पाहिजे

उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी, निलेश राणेंची जीभ घसरली
SHARES

उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याचे काय करायचे, हे मला वेगळे सांगायची गरज नाही. त्यांना फटके द्यायला पाहिजे, अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र नीलेश राणेंनी यांनी टीका केली आहे.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर रविवारी अमरावतीत काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. बांगर आपली बहीण आणि पत्नीसह देवदर्शनाला आले होते. यावेळी दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. यावरुन भाजप नेते निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला केला आहे.

राणे म्हणाले, ते चांगल्या भाषेत ऐकणार नाही. त्यांना फटके द्यायला पाहिजे. उद्धव ठाकरे पिसाळले आहेत की, त्यांना काय करावे हेच सुचत नाहीये आणि पिसाळलेल्या कुत्र्याचे काय करायचे? हे मला वेगळे सांगायची गरज नाही. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल.

पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पहिल्या भाषणापासून सांगत आहेत की, आमचा संयम तोडू नका. पण जर यांना संयम तोडायचा असेल तर कधी ना कधी दोन हात होणारच. यासाठी उद्धव ठाकरेंनी तयार राहावे, असा इशाराही नीलेश राणेंनी यावेळी दिला.हेही वाचा

शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

शिवसेनेला 'अशा'प्रकारे धनुष्यबाणाचं चिन्ह मिळालं! जाणून घ्या इतिहास

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा