Advertisement

शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा इतिहास जाणून घ्या, बाळासाहेबांचा 'हा' होता हेतू

बाळासाहेबांनी धनुष्यबाण कसा निवडला आणि त्यामागे काय होता हेतू जाणून ध्या धनुष्यबाणाचा इतिहास काय आहे ?

शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा इतिहास जाणून घ्या, बाळासाहेबांचा 'हा' होता हेतू
SHARES

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात सत्तासंघर्ष निर्माण झाला. शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची? धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार? यावरून सध्या सत्तासंघर्ष पेटला. अखेर आज निवडणूक आयोगानं हा पेच सोडवत निर्णय दिली आहे. 

अखेर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण गोठवलं; पक्षाचं नाव वापरण्यासही मनाई केली आहे. 

शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) लढाई आता आपलं धनुष्यबाण (Dhanushyaban) हे निवडणूक चिन्हं वाचवण्यासाठी सुरू होती. कारण बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या ‘धनुष्य बाणा’ वर दावा सांगण्यास सुरुवात केली. यासाठी दोन्ही पक्ष सुप्रिम कोर्टात  (Shivsena news supreme court) गेले. 

'अशी' झाली शिवसेनेची स्थापना

१९ जून १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली. या दरम्यान शिवसेना फक्त एक संघटना होती, तेंव्हा सेनेची नोंद राजकीय पक्ष म्हणून नव्हतीच. सेनेची सुरुवात समाजकारणामुळे झाली. समाजकारणाला गती मिळाली आणि १९६७ मध्ये सेना राजकारणात उतरली.

मात्र जेंव्हा १९८८ मध्ये निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांची नोंदणी करून घ्यायचं ठरवलं तेंव्हा आयोगाने सर्व पक्षांचे तसे प्रस्ताव मागवून घेतले. त्यात शिवसेना संघटनेचा देखील प्रस्ताव होता. सोबतच सेनेनं स्वतःची घटना तयार केली आणि त्या प्रस्तावासोबत ती घटना जोडली.

सेनेच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी झाली आणि निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेला मान्यता दिली आणि सोबतच सेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. अशाप्रकारे १९८९ साली शिवसेनेची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झाली.

कसं मिळालं चिन्ह?

परंतु निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळवण्यासाठी सेनेकडे मतदानाची टक्केवारी नसल्यामुळे पक्षाला चिन्ह मिळालं नाही.

मात्र त्याच्या काहीच महिन्यांनंतर म्हणजेच १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना -भाजप युती झाली. निवडणूक लढवली. सेनेचे ४ खासदार निवडून आले आणि सेनेने चिन्हासाठी लागणारी आवश्यक मतांची टक्केवारी पूर्ण केली.

पुन्हा निवडणूक आयोगाकडे सेनेने चिन्ह देण्याचा प्रस्ताव टाकला. सेनेने आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे आयोगाने त्यांना धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह बहाल केलं.

धनुष्यबाण चिन्ह कसं ठरवलं?

धनुष्य-बाण सेनेच्या केशर रंगाच्या ध्वजावर वापरला जातो. केशर रंग हिंदू धर्माचे प्रतीक म्हणून समोर येते. हा रंग पक्षाच्या मजबूत हिंदू राष्ट्रवादी भावनांचंही संकेत देतो.

धनुष्यबाण म्हणजे म्हणजे प्रभू रामाचं शस्त्र. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांनी सुद्धा ते चिन्ह मोठ्या आनंदाने स्वीकारलं. त्यानंतर आजतागायत सेनेने प्रत्येक निवडणुकांमध्ये हेच चिन्ह वापरलं.हेही वाचा

शिवसेना सोडून शिंदे गटात सहभागी होणारे चंपासिंह थापा आहेत तरी कोण?

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा