Advertisement

'यापुढे मला विचारल्याशिवाय...', राज ठाकरेंचा आदेश

मिरा रोड इथल्या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे.

'यापुढे मला विचारल्याशिवाय...', राज ठाकरेंचा आदेश
SHARES

मिरा रोड इथल्या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे. माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. 

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

"एक स्पष्ट आदेश. पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही," असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये सांगितलं आहे. 

मनसे नेते राज ठाकरेंना भेटणार

आज (बुधवारी) ठाण्यातील मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मिरा भाईंदरमधील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर नेते राज ठाकरे यांची भेट घेतील अशी शक्यता आहे. अविनाश जाधव, अभिजीत पानसे यांच्यासह इतर पदाधिकारी राज ठाकरेंना भेटू शकतात.

राज ठाकरे मिरा भाईंदरला जाणार?

आज मिरा रोडमध्ये  झालेल्या आंदोलनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच मीरा भाईंदरला जाणार असल्याची माहिती आहे. आंदोलनानंतर राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला आहे.

मिरा भाईंदरमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पाहायला मिळत असून, 3 जुलै रोजी व्यापारी संघटनेनं मनसेच्या विरोधात आंदोलन केलं होतं. त्यानंतर या आंदोलनाला मनसेकडून आज आंदोलनाने प्रत्युत्तर देण्यात आलं. या वादाच्या पार्श्वभूमवर लवकरच राज ठाकरे मिरा भाईंदरला जाणार आहेत.



हेही वाचा

विरोधी पक्षनेतेपदासाठी सभागृहात आवाज उचला: उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात आहे काय? आमच्या पैशांवर जगताय : निशिकांत दुबे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा