Advertisement

वाहतूक सेनेचा 'अन्नदाता वाहन' उपक्रम


वाहतूक सेनेचा 'अन्नदाता वाहन' उपक्रम
SHARES

अंधेरी - मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असतानाच रिक्षा, टॅक्सीचालक आणि वाहतूकदारांना खूश करण्यासाठी अन्नदाता वाहनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मुंबईतील रिक्षा-टॅक्सीचालक यांच्यासह इतर वाहतूकदारांसाठी स्वस्त दरात, उत्कृष्ट दर्जाचे अल्पोपहार आणि भोजन व्यवस्था यासाठी वाहतूक सेनेचा 'अन्नदाता वाहन' अभिनव उपक्रम राबवण्यात आला. उपक्रमाचे उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. 150 गाड्या पूर्ण मुंबईमध्ये चालवण्यात येणार असून, या गाड्या फक्त शिवसेना कार्यकर्ता असलेल्या नागरिकांना रोजगार म्हणून देण्यात येणार आहे. वाहतूक सेना पदधिकारी असणाऱ्या नागरिकांसाठी 5 रूपये सवलत देण्यात येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement