Advertisement

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण

गेल्या २ दिवसांपासून त्यांंना कोरोनाची लक्षणं दिसत होती. अखेर चाचणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण
SHARES

शिवसेना (shiv sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या २ दिवसांपासून त्यांंना कोरोनाची लक्षणं दिसत होती. अखेर चाचणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. पत्नीला कोरोनाची लागण झाल्यानं आता संजय राऊत यांनाही कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे.

मागील २ दिवसांपासून वर्षा संजय राऊत यांना ताप, सर्दी खोकला होता. कोरोनाची लक्षणं असल्याचं समोर आल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली. ही चाचणी सकारात्मक आली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतल्या फोर्टीस रुग्णालयात दाखल केलं आहे. पत्नीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (coronavirus) आल्यानं संजय राऊत यांना नियमाप्रमाणे कोव्हिड चाचणी करावी लागणार आहे. तूर्तास तरी त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नसल्याची माहिती आहे.

राऊतांच्या घरात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यानं आता राष्ट्रवादीच्या गोटातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण, संजय राऊत यांनी नुकतीच ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली होती. त्यामुळं आता संजय राऊत यांनाही कोरोनाची लागण झाली असेल तर शरद पवार यांचे काय, अशी भीती अनेकांना सतावत आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल काय येतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा