निवडणुकीसाठी 'वोटरमित्रा'

मुंबई - पालिका निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. सह्याद्री अतिथीगृहात राज्य निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाचं अनावरण, कॉप मोबाईल ॲप आणि मिस्ड कॉल सुविधेची सुरुवात केली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते बोधचिन्ह आणि अॅपचं उद्घाटन करण्यात आलं. या वेळी निवडणूक प्रक्रियेसाठी संगणकीय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. मतदार जागृतीसाठी 'वोटरमित्रा' हे बोधचिन्ह तयार करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने मतदारांना जागृत करण्यासाठी आणि प्रचारात गैरप्रकार टाळण्यासाठी सोशल मिडियाचा वापर केला आहे. या नवीन साधनामुळे नक्कीच फायदा होईल असा विश्वास राज्य निवडणूक आयोगाला आहे.

Loading Comments