दिव्यांगांसोबत वायकरांची दिवाळी

 Goregaon
दिव्यांगांसोबत वायकरांची दिवाळी
दिव्यांगांसोबत वायकरांची दिवाळी
दिव्यांगांसोबत वायकरांची दिवाळी
दिव्यांगांसोबत वायकरांची दिवाळी
See all

जोगेश्वरी - जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि गृहनिर्माण, उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून अंध- अपंगांबरोबर दिवाळी साजरी करण्याची परंपरा आजही जपलीय. या वर्षी श्यामनगर तलावाजवळ 'संगीतमय पहाट' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी रविंद्र वायकर आणि मान्यवरांच्या हस्ते अंध-अपंगाना आणि विभागातील शेकडो नागरिकांना भेटवस्तू आणि फराळ वाटण्यात आला. या वेळी वायकर यांनी फटाके फोडून या दिव्यांगांसोबत फटाके फोडून दिवाळी साजरी केली.

Loading Comments