आघाडी झाली नाही हे दुर्देवी - सुप्रिया सुळे

 Goregaon
आघाडी झाली नाही हे दुर्देवी - सुप्रिया सुळे
आघाडी झाली नाही हे दुर्देवी - सुप्रिया सुळे
आघाडी झाली नाही हे दुर्देवी - सुप्रिया सुळे
See all
Goregaon , Mumbai  -  

गोरेगाव - मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली नाही हे दुर्दैवी असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा प्रबळ होती मात्र काँग्रेसकडून सकारात्मक उत्तर आलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून खरा विकास होऊ शकतो. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नवी मुंबईसारख्या महापालिकांमध्ये विकास केला आहे. असं मत खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले. वॉर्ड क्रमांक 57च्या इच्छुक उमेदवार सुनिता कारंडे यांच्या कार्यालयाच्या उद् घाटनावेळी त्या बोलत होत्या.

गोरेगाव (प.) च्या भगतसिंगनगर क्रमांक 1 इथल्या हनुमान गल्ली या ठिकाणी मंगळवारी जनसंपर्क कार्यालयाचं उद् घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन अहिर, अजित रावराणे, जिल्हाध्यक्ष, सुखदेव कारंडे, तालुकाध्यक्ष यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

Loading Comments