सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही - मुख्यमंत्री

 Mumbai
सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही - मुख्यमंत्री

नरिमन पॉईंट - भाजपा सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचं असेल त्यांनी खुशाल जावे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे. नरिमन पॉईंट येथे झालेल्या विजयोत्सवात त्यांनी हे वक्तव्य केले.

महाराष्ट्रात भाजपाला झेडपी आणि महापालिकेत अत्यंत चांगले यश मिळाले आहे. भाजपाला सगळीकडून जनतेचे पाठबळ मिळत आहे. मोदी लाटेमुळे निवडून आलो असे सगळे म्हणतात. मात्र ही विश्वासाची लाट आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही लाटेवर निवडून आलो नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आमच्या पुढे अनेक आव्हानं आहेत. शेतकऱ्यांसाठी खूप काम करायचं आहे. पंधरा वर्षांत झालेल्या गोष्टी दोन वर्षांत बदलायला वेळ लागणार, असेही ते म्हणाले.

भाजपा हे 143 टक्क्याने वाढले आणि शिवसेना 4 टक्क्याने वाढली. राष्ट्रवादी काँग्रेस 33 टक्क्याने कमी झाली. आता भाजपाची जबाबदारी वाढली आहे असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि विविध मंत्री उपस्थिती होते.

Loading Comments