Advertisement

जेव्हा मंत्री कुष्ठरोग्यांना भेटतात...


जेव्हा मंत्री कुष्ठरोग्यांना भेटतात...
SHARES

कुष्ठरोग्यांकडे पाहण्याचा सामान्य माणसांचा दृष्टिकोनही वेगळाच असतो. लोकं कुष्ठरोग्यांपासून चार हात लांब राहणंच पसंत करतात. अशा वेळा एखाद्या मंत्र्यानं कुष्ठरोग्यांना भेट दिली तर त्यांचा अानंद अवर्णनीय असणार, यात तिळमात्र शंका नाही. मुंबईच्या वडाळा येथील अॅक्वर्थ महापालिका कुष्ठरोग रुग्णालयाला अाज नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी भेट दिली अाणि कुष्ठरोग्यांचा अानंद गगनात मावेनासा झाला. या भेटीदरम्यान रुग्णांना देण्यात येणाऱ्या अारोग्यसुविधांबाबतची पाहणी डाॅ. रणजित पाटील यांनी केली तसंच रुग्णालयातील अधिकारी अाणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.


जाणून घेतल्या रुग्णांच्या व्यथा

प्रशासनाच्या सहाय्यानं रुग्णालयातील कुष्ठरुग्णांसाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात अाणि त्यांना भविष्यात चांगलं जीवन जगता यावं, यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितले. रुग्णालयात ३० ते ४० वर्षांपासून दाखल असलेल्या कुष्ठरुग्णांना रुग्णालयामार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या औषधोपचाराबाबत माहिती घेऊन रुग्णांच्या व्यथा-संवेदना त्यांनी जाणून घेतल्या.


रुग्णांना मिळतात दर्जेदार सेवा

रुग्णालयातील संग्रहालयाला डाॅ. रणजित पाटील यांनी भेट दिली. महापालिकेशी संलग्न असलेलं हे रुग्णालय कुष्ठरुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवित असल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं. कुष्ठरुग्णांना औषधोपचार, विकृती प्रतिबंधन व रुग्णसमुपदेशन हे महत्त्वाचं कार्य हे रुग्णालय करीत असल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा