Advertisement

एकनाथ शिंदे नेमके नाराज का? 'ही' आहेत कारणं

एकनाथ शिंदे यांच्यासह 35 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे. परंतू नक्की शिंदे का नाराज आहेत यावर एक नजर...

एकनाथ शिंदे नेमके नाराज का? 'ही' आहेत कारणं
SHARES

विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेनेचे मोठे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 21 आमदार नॉट रिचेबल आहेत. या आमदारांशी शिवसेनेचा संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे

एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांना अनेक दिवसांपासून उधाण येत होते. शिंदे यांच्यासह 35 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे. परंतू नक्की शिंदे का नाराज आहेत यावर एक नजर...

आदित्य ठाकरेंना अधिक महत्त्व?

महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे सर्वात मोठे मंत्री आहेत. परंतू त्याऐवजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र अदित्य ठाकरे यांना झुकते माप दिले जात असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री असूनदेखील त्यांच्याऐवजी अदित्य ठाकरे यांना जास्त अधिकार असल्याने आपल्याला डावलले जात असल्याची भावना शिंदे यांची आहे. तसंच पक्षाच्या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत स्थान न दिल्याने शिंदे नाराज आहेत.

तीन पक्षातील घुसमट?

सराकरमधील तीन पक्षांत चढाओढ असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालंय. अंतर्गत घुसमट वाढत गेल्यानं एकनाथ शिंदे नाराज झाल्याचंही बोललं जातंय. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या राजकारणतली घुसमट वाढली आहे.

मुख्यमंत्रीपदाची आस?

2019 च्या निकालानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील, अशी चर्चा होती. भाजपसोबत युती सरकारची खलबतं सुरू असताना एकनाथ शिंदेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर होतं. मात्र युतीची बोलणी फिस्कटली. अखेर उद्धव ठाकरे यांच्या नावावरच तिन्ही पक्षांनी पसंती दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं होतं. त्यामुळे आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची आस लागलीये का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा