मनसेमध्ये फेरबदल


SHARE

दादर - मुंबई महानगर पालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलीय. त्यामुळेच दादरमध्ये मनसेमध्ये फेरबदल करण्यात आलेत. मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांची विभाग अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलीय. तर माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांची विभागप्रमुख पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आलीय. निवडणुकीच्या तोंडावर पक्षामध्ये होणारी बंडखोरी टाळण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे फेरबदल केलेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या