Advertisement

पोलीस पत्नी संघाचे उपोषण मागे


पोलीस पत्नी संघाचे उपोषण मागे
SHARES

मुंबई - गेले 39 दिवस उपोषणाला बसलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या अध्यक्षा यशश्री प्रमोद पाटील यांनी अखेर मंगळवारी उपोषण मागे घेतले. गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी मंगळवारी पोलीस पत्नी संघाची आजाद मैदानात भेट घेतली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

पोलिसांना आठ तास ड्युटी, हक्काचे घर, मुलांना पोलीस दलात नोकरी या प्रलंबित मागण्यांसाठी यशश्री पाटील उपोषणाला बसल्या होत्या. या मागण्या मान्य झाल्या आहेत. दोन दिवसांत यासंदर्भात बैठक घेतली जाणार आहे. पोलीस कुटुंबिय आणि सरकार यांची समन्वय समिती स्थापन करण्यात येईल. त्यानंतर मागण्यांबाबत अध्यादेश काढला जाईल असे आश्वासन केसरकर यांनी दिले. त्यानंतर उपोषण मागे घेतल्याचे यशश्री पाटील यांनी सांगितले.

 पोलीस पत्नी संघटनेच्या मागण्या

  • पोलिसांना आठ तास ड्युटी
  • हक्काची घरे
  • एका मुलाला पोलीस सेवेत सामावून घ्या
  • 2011 नंतरची पोलिसांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करा
  • अनुकंपा भरती लवकर करावी
  • पोलीस कल्याण निधीतून शहीदांना मदत मिळायला हवी
  • सेवानिवृत्त पोलीस आणि कुटुंबियांना मोफत वैद्यकीय सुविधा
  • पोलिसांवर हल्ले रोखण्यासाठी कडक नियम आणि उपययोजना
  • सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळायला हवी
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा