Advertisement

के पश्चिममध्ये महिलांचा दबदबा


के पश्चिममध्ये महिलांचा दबदबा
SHARES

अंधेरी - के पश्चिम विभागात एकूण 13 प्रभाग संख्या पूर्वी प्रमाणेच असले तरी 8 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे. दिलीप पटेल, मोसीन हैदर, अमित साटम, राजू पेडणेकर, चंगेज मुलतानी आणि संजय पवार यांचे वॉर्ड महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्याने या नगरसेवकांचा पत्ता कट झाला आहे. मात्र या भागात राजुल पटेल यांचे वर्चस्व असून त्यांच्यासाठी क्र 61 आणि 63 हे दोन वॉर्ड राखीव असल्याने महिला आघाडीत उत्साह वाढला आहे. तरी गेल्या विधानसभेला बीजेपीच्या डॉ. भारती लव्हेकर आणि अमित साटम या दोन आमदार निवडून आल्याने भाजपाची पक्ष बांधणी मजबूत झाल्याचे बोलले जात आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व कमी असल्याने सेना-भाजपामध्ये टक्कर होण्याची चिन्हे दिसत आहे.

यांच्यासाठी कमबॅक करण्याचा मार्ग मोकळा
स्थायी समिती अध्यक्ष, शैलेश फणसे खुला वर्ग 60 आणि 68
मा. वि. प. नेता बाळा आंबेरकर राखीव ओबीसी 62
जोत्स्ना दिघे खुला वार्ड 60
ज्योती सुतार राखीव 64
भावना मांगेला खुला वर्ग 71
विनिता वोरा राखीव 70
वनिता मारूचा खुला वर्ग 68

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा