यशवंतराव चव्हाण पारितोषिक प्रतापशेठ साळुंखेंना

 Vidhan Bhavan
यशवंतराव चव्हाण पारितोषिक प्रतापशेठ साळुंखेंना

नरिमन पॉइंट – यशवंतराव चव्हाण यांच्या 32 व्या पुण्यतिथी दिनी शुक्रवारी प्रतापशेठ साळुंखे यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक 2016 च्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याहस्ते साळुंखे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला.

दरम्यान शरद पवार यांनी यशंवतराव चव्हाणांच्या राजकीय जीवनातील आणि ग. दी माडगुळकरांच्या गीतांच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.

Loading Comments