घाटकोपरमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा रेलरोको

Ghatkopar, Mumbai  -  

शेतकरी संपामुळे अख्खा महाराष्ट्र पेटून उठलेला असतानाच आता मुंबईतही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. सर्वच स्तरातून शेतकरी संपाला पाठिंबा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या याच संपाला पाठिंबा देण्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी दुपारी संपाला पाठिंबा देण्यासाठी रेले रोको करण्यात आला. युवक काँग्रेसच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांनी घाटकोपर स्टेशनवर सीएसटीला जाणाऱ्या लोकलसमोर उतरून घोषणाबाजी केली. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या 15-20 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.


हेही वाचा - 

राज्यातील शेतकरी संपावर, महाराष्ट्र बंदची हाक

शेतकरी संपाच्या नेतृत्वासाठी राज ठाकरेंना साकडं


Loading Comments