राज्यातील शेतकरी संपावर, महाराष्ट्र बंदची हाक

  Mumbai
  राज्यातील शेतकरी संपावर, महाराष्ट्र बंदची हाक
  मुंबई  -  

  सरकारने आपल्या अनेक मागण्या मान्य कराव्यात यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी चौथ्या दिवशीही संप सुरुच ठेवला आहे. संपामुळे मुंबईत फळे, भाज्या यांची आवक घटली, तर दूध संकलनातही काही प्रमाणात घट झाली आहे.  

  सोमवारी मुंबईसह महाराष्ट्र बंद ठेवण्यात येईल असे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. या बंदला भाजपासोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनाचा फटका नाशिक आणि अहमदनगरसारख्या प्रमुख उत्पादन केंद्रालाही बसला. त्यामुळे  मुंबईत भाज्या आणि फळांची आवक घटल्याने त्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. कर्जमाफी आणि शेतकमालाला हमीभाव मिळावा यासह कमी दरात वीज उपलब्ध करून द्यावी या मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपाचे हत्यार उपसले आहे.

  हे देखील वाचा - 

  संपामुळे भाजीपाला महागला, 40 रुपयांची कोथिंबीर जुडी 150 रुपये

  हे देखील वाचा - 

  शेतकऱ्यांच्या संपात फूट

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.