Advertisement

शिवसेनेत बाळराजेंचं प्रमोशन?

शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने आता आदित्य ठाकरे यांना बढती देण्याच्या हालचालींना पक्षांतर्गत पातळीवर वेग आला आहे. त्यात शिवसेनेच्या नेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनेत बाळराजेंचं प्रमोशन?
SHARES

शिवसेनेच्या तिसऱ्या पिढीचं नेतृत्व आदित्य ठाकरेंकडे देण्याची तयारी सुरू झालीय. शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने आता आदित्य ठाकरे यांना बढती देण्याच्या हालचालींना पक्षांतर्गत पातळीवर वेग आला आहे. त्यात शिवसेनेच्या नेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


पक्षांतर्गत निवडणूक

पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम शिवसेनेने घोषित केला असून २३ जानेवारीला या निवडणुका होणार आहेत. शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने विभागीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्येष्ठ नेत्यांकडे पक्षाचे मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सोपविण्यात येऊन नव्या चेहर्‍यांना नेतेपदी संधी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची नेतेपदी लवकरच वर्णी लागू शकते.


लाॅबिंग सुरू

या पक्षांतर्गत निवडणुकीत शिवसेनापक्षप्रमुख, शिवसेना नेते, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि शिवसेना उपनेते या निवडणुकीत नेमले जाणार आहेत. नेतेपदासाठी सध्या मातोश्रीवर जोरदार लॉबिंग सुरू झालंय. अनेक नेते मातोश्रीवर येऊन भेटीगाठीही करत असल्याचं समजतं आहे.



हेही वाचा-

१८ किंवा २१ व्या वर्षी निवडणूक का लढवता येत नाही? - आदित्य ठाकरे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा