मुंबई विद्यापीठाच्या (mumbai university) सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेने बाजी मारली.
शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित युवा सेनेनं एकतर्फी विजय मिळवलाय. युवासेनेनं भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला धूळ चारली आहे.
आगामी विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिल्यानंतर मंगळवारी राज्य सरकारला सिनेटची निवडणूक घ्यावी लागली होती. एकूण 10 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत अनेक संघटना उतरल्या होत्या. मात्र खरी लढत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेना (yuva sena) व भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) उमेदवारांमध्ये होती.
ठाकरेंच्या युवासेनेच्या शीतल देवरुखकर यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून (SC) 5498 मतं मिळवत अभाविपचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजेंद्र सायगावकर यांचा पराभव केला. सायगावकर यांना केवळ 1014 मतं पडली.
भटके विमुक्त प्रवर्गातून (NT) शशिकांत झोरे यांनी अभाविपच्या अजिंक्य जाधव यांचा पराभव केला. झोरे यांना 5,170 मते मिळाली तर अजिंक्य जाधव यांना केवळ 1066 मतं मिळवता आली.
महिला प्रवर्गातून स्नेहा गवळी यांनी अभाविपच्या रेणुका ठाकूर यांना मात दिली. गवळी यांना 5914 मतं मिळाली तर ठाकूर यांना अवघी 893 मतं मिळाली.
विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
1) स्नेहा गवळी-महिला राखीव
2) मयुर पांचाळ-इतर मागसवर्ग
3) शीतल देवरुखकर-अनुसूचित जाती
4) धनराज कोहचाडे-अनुसूचित जमाती
5) शशिकांत झारे
हेही वाचा