Advertisement

बीडीडीची अवस्थाही धारावीसारखीच होणार?


बीडीडीची अवस्थाही धारावीसारखीच होणार?
SHARES

मुंबई – धारावी पुनर्विकासासाठी निविदेवर-निविदा काढूनही एकही विकासक पुनर्विकासासाठी पुढे येत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे धारावीचे भिजत घोंगडे असून सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. असं असताना आता बीडीडी पुनर्विकास प्रकल्पही धारावीच्याच वाटेवर जात असल्याचं दिसत आहे.

नायगांव आणि डिलाइटरोड या दोन ठिकाणच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी विकासक उत्सुक नसल्याचं चित्र दिसत आहे. कारण या दोन ठिकाणच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठीच्या निविदा पूर्व बैठकीला केवळ दोन विकासकांनीच हजेरी लावल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली आहे.

निविदा पूर्व बैठकीस हजेरी लावलेल्या दोन विकासकांनी म्हाडावर प्रश्नांचा भडीमार केला. या वेळी त्यांनी रहिवाशांचा विरोध हा मुद्दा अडचणींचा ठरेल असं म्हणत प्रकल्पातील अनेक अडचणी कशा दूर करणार असा सवाल म्हाडाला केला. म्हाडाकडे मात्र याची उत्तरं या वेळी नसल्याने दोन विकासकही या पुर्नविकासासाठी उत्सुक नसल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे धारावीप्रमाणेच बीडीडीलाही विकासक ठेंगा दाखवतील आणि धारावीप्रमाणेच हा प्रकल्पही रखडेल, अशी चर्चा म्हाडात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement