Advertisement

'हा' आहे मुंबईतला सगळ्यात महागडा फ्लॅट

नेपियन्सी रोडवर तयार होत असलेल्या एका लक्झरिअस टाॅवरमध्ये तापरिया कुटुंबाने ४ फ्लॅट बुक केले आहेत. हा टाॅवर रूणवाल ग्रुपकडून बांधण्यात येत असून या टाॅवरचं नाव 'द रेसिडेन्स' असं आहे. या टाॅवरमधील २८ ते ३१ अशा ४ मजल्यांवरील ४ फ्लॅट्स तापरिया कुटुंबाने खरेदी केले आहेत. बुधवारी तापरिया कुटुंबाची कायदा सल्लागार कंपनी वाडिया गांधीने एक नोटीस जारी करत ही माहिती दिली.

'हा' आहे मुंबईतला सगळ्यात महागडा फ्लॅट
SHARES

मुंबईत लहानसं घर खरेदी करणंही जिथं सर्वसामान्यांना कठीण जात असताना, दुसऱ्या बाजूला गर्भश्रीमंत एकापेक्षा एक महागडं घर खरेदी करत सुटले आहेत. मुंबईत एका श्रीमंत कुटुंबाने प्रति चौरस फूट १.२० लाख रुपये खर्चून एक-दोन नव्हे, तर तब्बल ४ फ्लॅट खरेदी केले आहेत. या ४ फ्लॅटची एकूण किंमत २४० कोटी रुपये एवढी आहे.

४ मजल्यांवरील ४ फ्लॅट्सची खरेदी

नेपियन्सी रोडवर तयार होत असलेल्या एका लक्झरिअस टाॅवरमध्ये तापरिया कुटुंबाने ४ फ्लॅट बुक केले आहेत. हा टाॅवर रूणवाल ग्रुपकडून बांधण्यात येत असून या टाॅवरचं नाव 'द रेसिडेन्स' असं आहे. या टाॅवरमधील २८ ते ३१ अशा ४ मजल्यांवरील ४ फ्लॅट्स तापरिया कुटुंबाने खरेदी केले आहेत. बुधवारी तापरिया कुटुंबाची कायदा सल्लागार कंपनी वाडिया गांधीने एक नोटीस जारी करत ही माहिती दिली.

किती रुपयांना एक फ्लॅट?

हे चारही फ्लॅट्स सुपर बिल्टअप एरियाचे असून या फ्लॅटचा एकूण कारपेट एरिया ४,५०० चौरस फुटांचा आहे. प्रति चौ.फूट १.२० लाख रुपये किमतीला हे ४ फ्लॅट खरेदी करण्यात आले आहे. त्यातील प्रत्येक फ्लॅटची किंमत ६० कोटी रुपये इतकी आहे. ३५ मजल्यांच्या या टाॅवरमध्ये एकूण २८ पार्किंग लाॅट आहेत.

कुणाच्या मालकीची होती जागा?

हा टाॅवर जिथं उभारला जात आहे, तिथं पूर्वी पतियाळा महाराजांच्या मालकीचा 'किलाचंद हाऊस' नावाचा बंगला होता. १९१८ साली बांधलेल्या या बंगल्याची मूळ किंमत २७० कोटी रुपये होती. पण त्यात लिलानी नावाचं कुटुंब राहात होतं. तेव्हा रूणवाल ग्रुपने २०११ मध्ये हा बंगला ३५० कोटी रुपयांना खरेदी केला. त्यातील ८० कोटी रुपये लिलानी कुटुंबालाही दिले आणि जागा मोकळी होताच टाॅवरचं बांधकाम सुरू केलं.

कोण आहे तापरिया कुटुंब

तापरिया कुटुंबाने २ वर्षांपूर्वी बीकेसीतील एका टाॅवरमध्ये ११ हजार चौ. फुटांचा डुप्लेक्स ६० कोटी रुपयांना विकत घेतला होता. तापरिया कुटुंबाकडे गर्भनिरोधक निर्माती कंपनी फॅमीकेअरची मालकी होती. ३ वर्षांपूर्वी त्यांनी ही कंपनी सुमारे ४,६०० कोटी रुपयांना विकली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा