Advertisement

आयटी, बँकिंग स्टॉकमध्ये मोठी घसरण; वाहन क्षेत्रावरही परिणाम

लाॅकडाऊनमुळे (lockdown) संपूर्ण देशातील व्यवहार ठप्प झाले आहेत. या नकारात्मक परिणाम शेअर मार्केटवर सातत्याने पडत असून आयटी आणि बॅंकिंग स्टाॅकमध्ये मोठी घसरण सुरू आहे.

आयटी, बँकिंग स्टॉकमध्ये मोठी घसरण; वाहन क्षेत्रावरही परिणाम
SHARES

लाॅकडाऊनमुळे (lockdown) संपूर्ण देशातील व्यवहार ठप्प झाले आहेत. या नकारात्मक परिणाम शेअर मार्केटवर सातत्याने पडत असून आयटी आणि बॅंकिंग स्टाॅकमध्ये मोठी घसरण सुरू आहे. त्याचप्रमाणे वाहन-खरेदी विक्री देखील थांबलेली असल्याने त्याचा वाहन उद्योगालाही फटका बसत आहे. ही अवस्था पुढील काही आठवडे सुरूच राहील, असा अंदाज एंजल ब्रोकिंगने (angel broking) वर्तवला आहे.

आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीच्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने ४%ची घसरणीसह हा दिवस नकारात्मक ठरला. आयटी आणि बँकिंग स्टॉकमध्ये मोठी घसरण झाल्याचं एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितलं. टेक महिंद्रा, टीसीएस आणि माइंड ट्री या टॉप आयटी प्लेअर्समध्येही सर्वाधिक ९.५ टक्क्यांनी घट दिसून आली तर कोटक बँक (एनएसई) सुद्धा ८.८३% नी खाली आले.

कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे वाहन क्षेत्रातही (auto industry) तीव्र घट दिसून आल्याचे अमर देव सिंह यांनी सांगितलं. भारतातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुती सुझूकीने सर्वात मोठी फेब्रुवारी महिन्यातील १५८,०७६ अंकांवरून आज मार्चमध्ये ८३,७९२ अंकांवर विक्रमी रितीने घसरली. दुसरीकडे अशोक लेलँडची विक्री मार्च महिन्यात ९०% पेक्षा कमी अंकांनी घसरली. या निर्देशानंतर निफ्टी ऑटो इंडेक्स १.५६ टक्क्यांनी घसरला तर बीएसई ऑटो इंडेक्स १.५४ टक्क्यांनी घसरला. हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो आणि एक्साइड इंडस्ट्रीजसह काही मोजकेच समभाग विरुद्ध दिशेने जाताना दिसले.

मार्च महिन्यात देशात लॉकडाऊन असल्याने एफपीआयने भारतीय इक्विटी मार्केटमधून १५.९ अब्ज डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक मागे घेतली. आशिया खंडातील हा सर्वाधिक एफपीआय आउटफ्लो असून यामुळे मार्केट खाली आले. येत्या काही दिवसांत भारताच्या कोरोना नियंत्रण उपायांवर एफपीआय काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं गंभीर स्वरुपाचं ठरेल.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा