Advertisement

शेअर बाजारात तेजीची लाट


शेअर बाजारात तेजीची लाट
SHARES

मुंबई शेअर बाजारात बुधवारी सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण दिसत असुन मुंबई शेअर निर्देशांकाबरोबरच 47 कंपन्यांच्या समभागांनी सर्वोच्च पातळी गाठली तर 150 कंपन्यांच्या समभागांनी गेल्या 52 आठवड्यांमधील उच्चांक गाठला. बुधवारी सकाळी कामकाजाला सुरुवात होताच मुंबई शेअर निर्देशांकाने 200 अंकांची उसळी घेत पुन्हा एकदा 30 हजाराची पातळी गाठताना नवा उच्चांक केला. राष्ट्रीय शेअर निर्देशांकातही 60 अंकांची वाढ झाली. एकीकडे मुंबई आणि राष्ट्रीय शेअर निर्देशांकात वाढ होतानाच सुरुवातीस सोने, क्रूड तेल आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली होती. मात्र बाजारातील तेजीच्या मूडमुळे दर पुन्हा वाढले.

मुंबई शेअर बाजारात आयशर मोटर्स, अल्ट्रा टेक सिमेंट, ब्रिटानीया, जे. के. सिमेंट, प्रॉक्टर अँड गँम्बल, आरती इंडस्ट्रीज, दालमिया भारत, ओएसएल इंडिया या कंपन्यांच्या समभागांनी आजपर्यंतची सर्वोच्च पातळी नोंदवली तर जिलेट, सिमेंन्स, सेंच्यूरी टेक्स्टाइल्स, कोटक महिंद्र बँक, रिलायन्स कॅपिटल, चेन्नई पेट्रो या कंपन्यानी गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकी पातळी गाठली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा