Advertisement

सेन्सेक्स २०५ अंकांनी घसरला, व्याजदर स्थिर ठेवल्याने गुंतवणूकदार नाराज


सेन्सेक्स २०५ अंकांनी घसरला, व्याजदर स्थिर ठेवल्याने गुंतवणूकदार नाराज
SHARES

रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवल्याने नाराज झालेल्या भारतीय शेअर बाजारात बुधवारी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेक्सेक्सने २०५ अंकांची घसरण नोंदवत ३२,५९७ ची पातळी गाठली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ७४ अंकांनी घटून १०,०४४ अंकांवर बंद झाला.

बुधवारी दुपारी द्विमासिक पतधोरणाचा आढावा घेताना पतधोरण आढावा समितीने व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे निराश झालेल्या गुंतवणूकदारांकडून जोरदार शेअरविक्री झाली. परिणामी निफ्टीवरील नोंदणीकृत ५० कंपन्यांपैकी ३९ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर केवळ ११ कंपन्यांचे शेअर्स वधारले.


कुठल्या कंपन्यांचे शेअर्स घसरले?

घसरण प्रामुख्याने बँक, आटो आणि रियाल्टी कंपन्यांच्या शेअर्समध्ये झाली. बँकिंग शेअर्समध्ये कॅनरा बँक, बँक आफ बडोदा, पीएनबी, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचडीएफसी बँकांच्या शेअर्समध्ये १.०८ ते २.५९ टक्क्यांची घट झाली.

आटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये आयशर मोटर्स, बजाज आटो, टाटा मोटर्स, डीव्हिआर, टाटा मोटर्स इ. कंपन्यांचे शेअर्स १.३१ ते २.६५ टक्क्यांनी घटले. तर रियाल्टी कंपन्यांच्या शेअर्सपैकी एचडीआयएल, इंडियाबुल्स, युनिटेक आणि गोदरेज प्रॅपर्टीजच्या शेअर्समध्ये ०.४४ ते १.४८ पर्यंत घट झाली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा