दिवसभरातील आघाडी गमावत सेन्सेक्स 3 अंकांच्या वाढीसह बंद

  Mumbai
  दिवसभरातील आघाडी गमावत सेन्सेक्स 3 अंकांच्या वाढीसह बंद
  मुंबई  -  

  ग्लोबल बाजारपेठेतून चांगले संकेत मिळाल्याने दिवसाच्या सुरूवातीलाच उत्तम वाढ नोंदवूनही मुंबई शेअर बाजार गुरूवारी दिवसअखेर नाममात्र वाढ नोंदवून बंद झाला. बँकिंग, कॅपिटल गुड्स, ऑईल अँड गॅस आणि ऊर्जा निर्मिती कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने दिवसभरातील सर्व आघाडी गमावली. दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स केवळ 3 अंकांची वाढ नोंदवून 30251 वर बंद झाला. तर निफ्टी 15 अंकांची वाढ नोंदवून 9422 वर बंद झाला.

  दिवसभरात सेन्सेक्स 30366 च्या सर्वोत्तम पातळीवर पोहोचला होता. परंतु वर नमूद केलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे सेन्सेक्सने आपली 115 अंकांची आघाडी गमावली. निफ्टी 50 मधील 29 कंपन्यांचे शेअर्स वाढ नोंदवून तर 22 कंपन्यांचे शेअर्स घट नोंदवून बंद झाले.

  यामुळे गमावली आघाडी-

  युरोपियन मार्केटच्या कमकुवत सुरूवातीमुळे देशांतर्गत बाजारपेठेवर दबाव आला. बाजार बंद होण्याच्या अर्ध्या तासात बँकिंग, कॅपिटल गुड्स, ऑईल अँड गॅस आणि ऊर्जा निर्मिती कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. यामुळे सेन्सेक्सने सर्व आघाडी गमावली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये ही विक्री झाली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.