Advertisement

काही मिनिटात ४ लाख कोटींचा चुराडा, शेअर बाजार कोसळला

कोरोनाची भिती आणि येस बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घातलेले निर्बंध यामुळे देशातील शेअर बाजारात शुक्रवारी भूकंप झाला.

काही मिनिटात ४ लाख कोटींचा चुराडा, शेअर बाजार कोसळला
SHARES

कोरोना व्हायरसची (coronavirus) भिती आणि येस बँकेवर (yes bank) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (rbi) घातलेले निर्बंध यामुळे देशातील शेअर बाजारात (share market) शुक्रवारी भूकंप झाला. सकाळी सेन्सेक्स (sensex) उघडताच तब्बल १४०० अंकांनी कोसळला. तर निफ्टी (nifty) ४०० अंकांनी पडला. या पडझडीत अवघ्या १ मिनिटात गुंतवणूकदारांच्या ४ लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला. 

जगात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. ८० देशात कोरोना पसरला आहे. भारतातही याचे रुग्ण वाढले आहेत. याचा परिणाम जगातल्या महत्त्वाच्या शेअर बाजारांमध्ये (share market) दिसू लागला आहे. कोरोनामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात, अशी भीती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली आहे. त्यामुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही पाहायला मिळाला. याशिवाय रिझर्व्ह बँकेने  (rbi) येस बँकेवर (yes bank) आर्थिक निर्बंध घातले असून खातेदारांना आता ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. ५० हजारांहून अधिकची रक्कम काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. यामुळे येस बँकेचा शेअर्स तब्बल ३० टक्क्यांनी घरूनच उघडला. याशिवाय इतर  एसबीआय, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा आदी कंपन्यांचे शेअर्सही कोसळले. 

 सेन्सेक्स  (sensex) उघडताच ८५६.६५ अंकांनी घसरला. त्यानंतर ही घसरण वाढत जाऊन सेन्सेक्स १,४०० अंकांनी खाली गेला.  सकाळी साडे नऊच्या सुमारास जवळपास सर्वच कंपन्यांचे शेअर कोसळले होते.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा