Advertisement

Chandrayaan-3 : ISRO च्या चंद्रयान-3 मोहिमेबद्दल 'या' 15 गोष्टी जाणून घ्या

भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची ही बाब आहे.

Chandrayaan-3 : ISRO च्या चंद्रयान-3 मोहिमेबद्दल 'या' 15 गोष्टी जाणून घ्या
SHARES

इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan-3 Mission) चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे. जाणून घ्या चंद्रयान मोहीमेसंदर्भातील 15 फॅक्ट्स... 

1) 'चंद्रयान-3' पाठवण्यासाठी एलव्हीएम-3 लाँचरचा वापर करण्यात आला आहे. जर लँडर सॉफ्ट दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश बनला.

2) चंद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलमध्ये लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे. ते दोघेही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरल्यानंतर, त्यांचं आयुष्य केवळ एका दिवसाचं असेल. म्हणजे चंद्रावरील एक दिवसात त्याचं संशोधन केलं जाईल.

3) चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. (चंद्रावर एक दिवस आणि एक रात्र असं चक्र पूर्ण होण्यासाठी पृथ्वीवरचे 28 दिवस लागतात.)

4) चंद्रयान-3 चे लँडर दोन मीटर लांब, दोन मीटर रुंद, एक मीटर 116 सेमी उंच आणि 1749 किलो वजनाचे आहे.

5) चंद्रयानाचे वजन पेलण्याची क्षमता इस्रोकडे असलेल्या फक्त LVM 3 कडे आहे. हेच रॉकेट आधी GSLV MK 3 म्हणूनही ओळखलं जायचं.

6) LVM3 हे भारताकडे असलेलं सर्वांत मोठं रॉकेट आहे, त्यामुळे त्याच्या सहाय्याने चंद्रापर्यंत जाणं, तेही कमीत कमी इंधनासह, यासाठी इस्रोने गोफण पद्धतीचा वापर केला. 

7) गोफणचा वापर शेतात पक्ष्यांना, जनावरांना पळवून लावण्यासाठी शेतकरी एका दोरीला एक दगड बांधून तो दोर पाच-सहावेळा गरागरा फिरवून मग तो दगड वेगाने सोडून देतात.

8) इस्रोने याच गोफणच्या तंत्रज्ञानाचा वापर करून, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने कमीत कमी इंधन खर्च करून चंद्र गाठण्याचा मार्ग आखला. थेट चंद्राच्या दिशेने सरळ प्रवास करण्याऐवजी चंद्रयान हळूहळू आपली कक्षा पृथ्वीपासून दूर वाढवत जातं.

9) एका ठराविक अंतरावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राबाहेर पोहोचल्यावर चंद्रान चंद्राच्या दिशेने जाऊन मग चंद्राच्या कक्षेत प्रवेश करतं.

10) चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या आधारे पृष्ठभागावर उतरलं. अशा प्रकारे कमी शक्ती आणि इंधनाचा वापर करून पण जास्त लांबचा प्रवास करून यान चंद्रावर पोहोचलं.

11) सर्व उपकरणांना चालवण्यासाठी वीज लागते. चंद्रयान-3 मध्ये बॅटरीसोबतच वीज निर्मितीसाठी सोलर पॅनेल लावण्यात आलेत.

12) चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा घनतेची तपासणी करेल. तिथल्या आयन आणि इलेक्ट्रॉन्सची पातळी आणि काळानुसार त्यात होणारे बदल यांचा अभ्यास करून माहिती गोळा करेल. तसेच चंद्राच्या पृष्ठभागावरील गुणधर्मांचा अभ्यास करेल.

13) इंस्ट्रुमेंट फॉर लूनार सिस्मिक एक्टिविटी हे उपकरण चंद्रयान-3 च्या लँडिंग स्थळावर होणाऱ्या भूकंपाच्या हालचालींची तपासणी करेल. चंद्रावर भविष्यात मानवी वस्ती करण्यासाठी हा महत्वाचा शोध असेल.

14) चंद्रावर होणारे भूकंप चंद्राच्या पृष्ठभागावरही होतात. भूकंप ओळखण्यासाठी सेस्मोग्राफरही लँडरवर बसवण्यात आला आहे.

15) चंद्रयाना मोहिमेत चंद्रयान-3 च्या लँडिंग साइटवरील भूकंपाच्या हालचालींचा अभ्यास करेल आणि चंद्राच्या कवच आणि आवरणाची तपासणी करेल.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा