• कधी पाहिली आहे का अशी रॅली?
SHARE

रस्त्यावर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी एखादी दृष्टीहीन व्यक्ती दिसली, तर त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी आपण पुढे जातो. पण त्याच्या अगदी उलट दृश्य मुंबईतल्या 'ब्लाइंड कार रॅली'त पाहायला मिळालं. जिथे दृष्टीहीन व्यक्ती डोळस व्यक्तींना मार्गदर्शन करत होती. वरळीतल्या एनएसआय इथं 'कार रॅली फॉर ब्लाइंड'चं आयोजन करण्यात आलं होतं. एमएसआय इथून सकाळी 9 वाजता सुरू झालेली ही रॅली दुपारी 1 वाजता समाप्त झाली. हाजीअली, पेडर रोड, मरीन लाइन्स, चर्चगेट असा या रॅलीचा मार्ग होता.कोणी मारली बाजी?

जवळपास 95 चालक आणि दृष्टीहीनांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबियांचा देखील पाठिंबा होता. या स्पर्धेत चर्चगेट इथं राहणारे बाळू शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 'राऊंड टेबल ब्लाईंड मॅन'च्या वतीनं 12व्या कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीमधल्या गाड्या डोळस व्यक्तींद्वारे चालवण्यात आल्या. पण त्यांना रॅलीचा नकाशा आणि मार्ग दृष्टीहीन व्यक्तींनी सांगितला. दृष्टीहीन व्यक्तीनं चालकाला बाजूच्या सीटवर बसून मार्गदर्शन चालकाला केलं.


रॅलीचा उद्देश

डोळस आणि दृष्टीहीन व्यक्तींमध्ये समन्वय निर्माण व्हावा, या दृष्टीकोनातून दरवर्षी या अनोख्या रॅलीचं आयोजन करण्यात येतं. याशिवाय दृष्टीहिनांचा आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमता वाढावी, डोळस व्यक्तींनी दृष्टीहीनांच्या समस्या समजावून घ्याव्यात, या उद्देशानं या रॅलीचं आयोजन केलं जातं. या रॅलीतून येणारी रक्कम दृष्टीहीन, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि विकासासाठी वापरण्यात येणार आहे.हेही वाचा

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना!


संबंधित विषय
ताज्या बातम्या