Advertisement

COVID-19: ५० वर्षाच्या व्यक्तीनं १४ वेळा केला प्लाझ्मा दान

एका ५० वर्षीय व्यक्तीनं जून २०२० मध्ये कोविड -१९ मधून बरे झाल्यानंतर १४ वेळा प्लाझ्मा दान करून विक्रम नोंदवला आहे.

COVID-19: ५० वर्षाच्या व्यक्तीनं १४ वेळा केला प्लाझ्मा दान
(Representational Image)
SHARES

पुणे इथल्या एका ५० वर्षीय व्यक्तीनं जून २०२० मध्ये कोविड -१९ मधून बरे झाल्यानंतर १४ वेळा प्लाझ्मा दान करून विक्रम नोंदवला आहे.

धोरणात्मक सल्लागार म्हणून काम करणारे अजय मुनोत यांनी असा दावा केला की, १४ वेळा प्लाझ्मा दान करणारे ते देशातील पहिले व्यक्ती आहेत. शिवाय त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

ते म्हणाले, “मी माझा पहिला प्लाझ्मा जुलैमध्ये बरे झाल्यानंतर २८ दिवसांनी दान केला आणि जेव्हा रुग्णाच्या कुटुंबातील प्लाझ्मा दाता शोधत होता.”

शिवाय, "प्लाझ्मा दान केल्यावर त्याला कधीही अशक्त किंवा अस्वस्थ वाटले नाही. प्लाझ्मा रक्तापासून विभक्त होतो आणि त्यामध्ये प्रतिपिंडे असतात. प्लाझ्मा दान रक्तदान नाही. मी आता १५व्या वेळी देखील प्लाझ्मा दान करण्यास तयार आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

सह्याद्री रुग्णालयात डॉ. पूर्णिमा राव यांच्या म्हणण्यानुसार, मुनोत यांनी रुग्णालयात १४ वेळा प्लाझ्मा दान केला आहे. प्लाझ्मा देणगीचा दातावर परिणाम होत नाही. खरं तर, हे अस्थिमज्जाच्या कार्यास उत्तेजन देते आणि नवीन रक्त पेशी तयार करण्यास प्रवृत्त करतं.



हेही वाचा

मुंबईत 'म्युकरमायकोसिस'चे १११ रुग्ण आढळले

जॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना प्रतिबंधक लस भारतात बनणार?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा