Advertisement

मला बायकोच्या हत्येची परवानगी द्या! नारायण लवाटे यांचा निर्वाणीचा इशारा

आपण दोघांनीही इच्छामरणाची मागणी केली आहे. पण, आपली मागणी राष्ट्रपती ऐकणार नाही, असं मला वाटतं. यामुळे ३ मार्चनंतर तुम्ही मला गळा दाबून मारू शकता, हाच एक पर्याय मला दिसतो आहे, असं पत्र ७९ वर्षांच्या इरावती लवाटे यांनी आपल्या पतीला लिहिलं आहे.

मला बायकोच्या हत्येची परवानगी द्या! नारायण लवाटे यांचा निर्वाणीचा इशारा
SHARES

राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी करुन थकलेल्या लवाटे या वृद्ध दाम्पत्याने आता स्वत: च्या हत्येची योजना आखली आहे. मला माझ्या बायकोच्या हत्येची परवानगी द्या म्हणत, नारायण लवाटे यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.


काय आहे मागणी?

आपल्याला आता जगायचं नाही. त्यामुळे आम्हा दोघांना एकत्र मरण द्यावं, या मागणीसाठी लवाटे दाम्पत्य गेल्या कित्येक वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. या आशयाचं पत्रही त्यांनी राष्ट्रपतींकडे सुपूर्द केलं आहे. त्यानुसार, राष्ट्रपतींनी तीन महिन्यांत या पत्रावर उत्तर देणं गरजेचं आहे, असं नाही झाल्यास मला माझ्या बायकोची हत्या करण्याची मुभा द्या. म्हणजे ती आधी मुक्त होईल आणि मग मी जाईन, असं ८६ वर्षांचे नारायण लवाटे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं.


समाजासाठी उपयोग नाही

हे दाम्पत्य गिरगावातील ठाकूरद्वारमधील चाळीत राहतं. या दाम्पत्याला मुल नाही तसंच कुठला गंभीर आजारही नाही. वयानुसार समाजासाठी आपला काहीही उपयोग नसून स्वतःचा सांभाळ करण्यासाठी आपण आता सक्षम नाही, असं या दाम्पत्याला वाटतं आहे. लग्नाच्या पहिल्याच वर्षी लवाटे दाम्पत्यानं मूल जन्माला घालायचं नाही, असा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांना कुणीही वारस नाही.


अरूणासारखं हवंय इच्छामरण

नर्स अरूणा शानबाग यांना इच्छामरण मिळावं, यासाठी केईएम हॉस्पिटलने दया याचिका दाखल केली होती. ते वाचून या दाम्पत्याने इच्छामरणाचा विचार केला.


राष्ट्रपतींकडून दुर्लक्ष

२१ डिसेंबरला या दाम्पत्यानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केली होती. ३१ मार्च २०१८ पर्यंत उत्तराची वाट पाहू, असं या जोडप्याने पत्रात नमूद केलं होतं. पण, पत्र पाठवून दोन महिने उलटत असून, त्यांचं पत्र गांभीर्याने घेतलं नसल्याने त्यांनी एकमेकांच्या हत्येची योजना आखली आहे.



लिहिलं पत्र

७९ वर्षीय इरावती लवाटे यांनी पती नारायण यांना मार्मिक पत्र लिहिलं आहे. ३१ मार्चनंतर तुम्ही मला गळा दाबून मारू शकता. त्यानंतर तुम्हालाही मृत्यूदंडाची शिक्षा होईल, असं इरावती यांनी पत्रात लिहिलं आहे. आपण दोघांनीही इच्छामरणाची मागणी केली आहे. पण, आपली मागणी राष्ट्रपती ऐकणार नाही, असं मला वाटतं. यामुळे ३ मार्चनंतर तुम्ही मला गळा दाबून मारू शकता, हाच एक पर्याय मला दिसतो आहे.

मला मारणं ही एक योजनापूर्ण हत्या असेल. ज्यामुळं कोर्ट तुम्हाला गुन्हेगार ठरवून फाशीची शिक्षा देईल, असं इरावती यांनी पत्रात लिहिलं आहे.


३० वर्षांपासून पाठपुरावा

अनेक वर्षे सोबत सुखाने जगलो आता आम्हाला सोबत मृत्यू मिळावा म्हणून आम्ही इच्छा मरणाची मागणी केली आहे, असं या दोघांचं म्हणणं आहे. इच्छामरणाचा कायदा व्हावा, म्हणून हे दाम्पत्य ३० वर्षांपासून पाठपुरावा करत आहे.

नारायण लवाटे हे एस.टी. महामंडळाच्या अकाऊंट विभागात कार्यरत होते. तर इरावती लवाटे या गिरगावातील आर्यन हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा