नेरळ इथल्या एका घरात चोरी करायला गेलेल्या चोराने सॉरी नोट लिहून चोरलेले सामान परत केले आहे. 14 जुलै रोजी ही घटना उघडकीय आली. टॉयलेटची खिडकी उघडी असल्याने घरात चोरी झाल्याची शक्यता शेजाऱ्यांना आली. त्यानंतर त्यांनी फोन करून घर मालकांना कळवले. पण हे मालक दुसरे तिसरे कोण नाही तर दिग्गज कवी नारायण सुर्वे होते.
नेरळच्या गंगानगरमधील ज्या घरात चोरीची घटना घडली ते घर दिग्गज कवी नारायण सुर्वे यांचे असून सध्या त्यांची मुलगी व त्यांचे जावई राहतात. ते सुर्वे यांच्या सर्व आठवणी, पुस्तके आणि फोटोंसह घरात राहत आहे. घरात शिरल्यावर सर्व सामान घरभर पसरलेले त्यांना आढळले.
पुढे गेल्यावर त्यांना भिंतीवर एक 'सॉरी' चिठ्ठी लावलेली दिसली त्यात लिहिले होते. "हे घर कवी नारायण सुर्वे (narayan surve) यांचे आहे हे मला माहीत नव्हते नाहीतर मी इथे चोरीचा प्रयत्न केला नसता. मी टीव्ही चोरला आहे आणि परत करत आहे. मला माफ करा.”
चोर अनेक दिवस येऊन घरातील धान्य तसेच इतर वस्तू चोरत होता. शेवटी एके दिवशी त्याला नारायण सुर्वेंचा फोटो दिसला आणि कळले की ते त्यांचेच घर आहे. घरात रोख रक्कम किंवा दागिने नव्हते त्यामुळे कोणत्याही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या नाहीत. तीन मजली घराच्या तळमजल्यावर चोरीचा प्रयत्न झाला.
नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे म्हणाले, “आम्ही हाताचे ठसे घेतले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले असून गुन्हेगाराचा शोध घेत आहोत.”
हेही वाचा