Advertisement

ब्रिटानिया अॅण्ड कंपनी रेस्टॉरंटचे मालक बोमन कोहिनूर यांचं निधन

जुन्या पारसी/इराणी हॉटेलचे मालक बोमन कोहिनूर यांचं आज (बुधवारी) निधन झालं. गेल्या दोन आठवड्यांपासून ते आयसीयूमध्ये होते. बुधवारी सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी त्यांचं निधन झालं.

ब्रिटानिया अॅण्ड कंपनी रेस्टॉरंटचे मालक बोमन कोहिनूर यांचं निधन
SHARES

मुंबईतील ब्रियानिया अॅण्ड कंपनी सर्वांनाच माहित आहे आणि ब्रिटानियाचे मालक बोमन कोहिनूर हे देखील तुमच्या लक्षात असतीलच. फोर्ट इथल्या ब्रिटानिया अॅण्ड कंपनी या जुन्या पारसी/इराणी हॉटेलचे मालक बोमन कोहिनूर यांचं आज (बुधवारी) निधन झालं. गेल्या दोन आठवड्यांपासून ते आयसीयूमध्ये होते. बुधवारी सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी त्यांचं निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते


लहान वयात रेस्टॉरंटची जबाबदारी

दक्षिण मुंबईवर स्थित, ब्रिटानिया अँड कंपनीची स्थापना १९२३ साली झाली. इराणमधील झोरोएस्टेरियन प्रवासी आणि बोमन कोहिनूर यांचे वडिल रशीद कोहिनूर यांनी हे रेस्टॉरंट सुरू केलं.  रशीद कोहिनूर यांच्यानंतर हे रेस्टॉरंट बोमन कोहिनूर यांच्या मालकीचं झालं. तेव्हा बोमन हे २० वर्षांचे होते.


हॅपी गो लकी मॅन

९७ वर्षीय बोमन कोहिनूर एक आनंदी व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. रेस्टॉरंटमध्ये आलेल्या ग्राहकांशी गप्पा मारायला त्यांना खूप आवडायचं. बोमन कोहिनूर या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांचं मन त्यांच्या मजेशीर गप्पांनी जिंकायचे. कधी कधी तर ते ग्राहकांना रेस्टॉरंटचे जूने फोटो दाखवायचे. एखाद्या ग्राहकाला काय हवं? काय नको? याबद्दल विचारपूस करायचे. “बेरी पुलाव नक्की ट्राय करा, ही माझ्या पत्नीची रेसिपी आहे. “दोन लोकांमध्ये एकच बेरी पुलाव खात आहात? तुम्हाला नक्की पुरेल ना? ग्राहकांपाशी जाऊन ते अशी विचारपूस करायचे.


ब्रिटीश राजघराण्याचे मोठे फॅन

बोमन कोहिनूर हे ब्रिटीश राजघराण्याचे मोठे चाहते होते. रॉयल कुटुंबातील सदस्यांना भेटण्याचं त्यांचं स्वप्न होतं. जेव्हा ड्यूक आणि डचेस ऑफ केंब्रिजचे प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन भारतात आले तेव्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये बोमन कोहिनूर राजकुमार आणि राजकन्या यांना भेटण्याची विनंती करत होते. शेवटी, बोमन यांना भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं.

१९४७ म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी या रेस्टॉरंटमध्ये कॉन्टिनेंटल जेवण मिळायचं. पण स्वातंत्र्यानंतर बोमन यांनी पारसी आणि मुगलाई जेवण रेस्टॉरंटमध्ये सुरू केलं. पारंपारिक पद्धतीनं केलेली हॉटेलची रचना, आसनव्यवस्थे सोबतच येथील पदार्थांची चव तुम्हांला अस्सल पारसी खाद्यसंस्कृतीची आठवण करून देईल. मटण धनसक, चिकन बेरी पुलाव, साली बोती हा मटनाचा प्रकार देखील चविष्ट आहे


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा