दहिहंडी फोडताना ५१ गोविंदा जखमी


दहिहंडी फोडताना ५१ गोविंदा जखमी
SHARES

मुंबईत अनेक ठिकाणी छोट्या दहीहंड्या लावण्यात आल्या होत्या. या हंड्या फोडण्यासाठी मुंबईतील विविध भागांतून आणि मुंबईबाहेरून आलेल्या गोविंदा पथकातील तब्बल ५१ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमी गोविंदांपैकी २४ गोविंदांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या गोविंदांची प्रकृती स्थिर असून आतापर्यंत २७ गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

नायर हॉस्पिटल ६, केईएम हॉस्पिटल १२, सायन हॉस्पिटल ४, जेजे हॉस्पिटल १, जसलोक हॉस्पिटल १, गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटल २, एमटी अग्रवाल हॉस्पिटल १, राजावाडी हॉस्पिटल १०, कूपर हॉस्पिटल ४, ट्रॉमा केअर हॉस्पिटल ३, व्ही. एन. देसाई हॉस्पिटल १, कांदिवली शताब्दी हॉस्पिटल ६ असे एकूण ५१ गोविंदा जखमी झाले आहेत तर यापैकी २७ गोविंदाना प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

जखमी गोविंदांची नावे

सूरज भोरेकर (२६), राहुल पेतलान (२७), कुणाल यादव (१०), विवेक कोचरेकर (३२), महेश धुरी (२४), यज्ञेश देसाई  (१९), संकल्प पवार (२१), विपुल सिंह (२३), अविनाश वारीक (२३), रक्षा भगत (१९), सतीश जाधव (३५), अभिषेक अडाले (३५), संतोष पवार (३०), सुशांत थोरात (२०), चरण भगत (२६), रोहित मांजरेकर (१९) हे गोविंदा जखमी झाले आहेत.

संबंधित विषय